सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा २० वा दिवस; डॉक्टरांनी दिला ऑर्गन फेल्युअरचा गंभीर इशारा, काँग्रेसचे नेते पवन खेरा उपोषणस्थळी दाखल, आंदोलनाला पाठिंबा

Foto
नवी दिल्ली : दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला आज २० दिवस पूर्ण झाले आहेत. नीट सारख्या मोठ्या परीक्षांमधील पेपर लीक प्रकरणाचा निषेध करत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ते २८ जूनपासून उपोषण करत आहेत. गेल्या २० दिवसांपासून अन्नत्याग केल्यामुळे वांगचुक यांचे शरीर अत्यंत अशक्त झालं आहे. कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी वांगचुक यांची प्रकृती अत्यंत खालावली असून त्यांच्या शरीरातील हाडं दिसू लागली आहे, तसेच त्यांना चालणं-फिरणंही कठीण झाल्याचं म्हटलं आहे. याच दरम्यान डॉक्टरांनी वांगचुक यांच्या आरोग्याबाबत अत्यंत गंभीर इशारा दिला आहे.

डॉ. सतीश लांबा यांनी दिलेल्या माहितीनुसार, उपोषणाला सुरुवात केल्यापासून सोनम वांगचुक यांचं वजन तब्बल ९ किलोपेक्षा जास्त घटलं असून, ते आता केवळ ५६.९ ग्रॅम वजनाचे झाले आहेत. डॉक्टरांनी स्पष्ट केलं की, दीर्घकाळ उपाशी राहिल्यामुळे आता त्यांचं शरीर ग्लुकोज आणि फॅट संपलं आहे. त्यांच्या शरीरातील यूरिक अ‍ॅसिडचं प्रमाण कमालीचे वाढलं आहे. जर सरकारने तातडीने हस्तक्षेप केला नाही, तर वांगचुक यांचे ऑर्गन फेल होऊ शकतात, अशी भीती डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.

दिल्ली उच्च न्यायालयाचा हस्तक्षेप
दिल्ली उच्च न्यायालयाने या गंभीर प्रकरणात हस्तक्षेप केला आहे. एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने अधिकार्‍यांना निर्देश दिले आहेत की, वांगचुक यांच्या तब्येतीवर दररोज देखरेख ठेवावी आणि प्रकृती खालावल्यास तातडीने आवश्यक ते वैद्यकीय उपचार करावेत. कोणत्याही नागरिकाचा जीव अत्यंत मौल्यवान आहे आणि तो वाचवण्यासाठी सरकारने सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत असे न्यायालयाने नमूद केलं. केंद्र आणि दिल्ली सरकारच्या वतीने उपस्थित राहिलेले सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनीही न्यायालयाच्या या मताशी सहमती दर्शवली.

उपोषण मागे घेण्यास वांगचुक यांचा नकार
डॉक्टरांच्या गंभीर इशार्‍यांनंतरही सोनम वांगचुक मागे हटण्यास तयार नाहीत. त्यांनी एक व्हिडीओ संदेश जारी करत म्हटलं आहे की, ङ्गङ्घआम्ही हे आंदोलन एवढ्या लवकर संपवणार नाही.ङ्घङ्घ त्यांनी आपल्या समर्थकांना २० जुलै रोजी होणार्‍या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन आंदोलन करण्याचं आवाहन केलं आहे. तसेच, विद्यार्थ्यांनी या आंदोलनाकडे लोकशाही आणि राज्यशास्त्राचा एक धडा म्हणून पाहावं असंही वांगचुक म्हणाले.

उपोषण मागे घेण्याचं देशभरातून आवाहन
जंतर-मंतरवरील या आंदोलनाला देशभरातील अनेक मोठ्या नेत्यांचा आणि प्रतिष्ठित व्यक्तींचा पाठिंबा मिळत आहे. अरविंद केजरीवाल यांनी जंतर-मंतरवर जाऊन वांगचुक यांची भेट घेतली आणि केंद्र सरकारने विद्यार्थी व वांगचुक यांच्या मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणी केली. याशिवाय विशाल ददलानी, अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा, शोभा डे, राज ठाकरे आणि अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी वांगचुक यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली आहे.